ठळक घडामोडी

तळवडे बाजारपेठेत आज रंगणार ‘राजा मणीध्वज माया सुंदरी’ दशावतारी नाटकाचा प्रयोग!

तळवडे बाजारपेठेत आज रंगणार ‘राजा मणीध्वज माया सुंदरी’ दशावतारी नाटकाचा प्रयोग

तळवडे येथील ‘व्यापारी संघ’ यांच्या वतीने नवीन वर्ष २०२६ निमित्त आयोजन

तळवडे:

तळवडे येथील ‘व्यापारी संघ’ यांच्या वतीने नवीन वर्ष २०२६ निमित्त भव्य दशावतारी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आला आहे.
श्री. भास्कर वैद्य प्रस्तुत आणि जय संतोषीमाता दशावतार नाट्य मंडळ (मातोंड-पेंडूर) यांचा लोकप्रिय पौराणिक नाट्यप्रयोग ‘राजा मणीध्वज माया सुंदरी’ शनिवारी सादर केला जाणार आहे.

  • दिनांक: शनिवार, ३ जानेवारी २०२६
  • वेळ: रात्री ठीक ७:०० वाजता
  • स्थळ: तळवडे गेट – बाजारपेठ

या कार्यक्रमाचे आयोजन व्यापारी संघ, तळवडे यांच्या वतीने करण्यात आले असून, सर्व नागरिकांनी या कलेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सांस्कृतिक परंपरेची जोपासना करण्याच्या उद्देशाने हा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे.