सावंतवाडी तालुक्यातील तळवडे खेरवाडी या ठिकाणी 25 डिसेंबरला दत्तजयंती उत्सव


सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील खेरवाडी या ठिकाणी 25 डिसेंबर रोजी दत्तजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे . या उत्सवला मोठया प्रमाणात दत्तभक्त दर्शनासाठी येतात.

यावेळी दत्त जयंती उत्सव कार्यक्रम निमित्त सोमवारी सकाळी 7 वाजता ह .भ .प .श्री रामचंद्र मेस्त्री कालेली यांचे कीर्तन होणार आहे .तसेच रात्रौ 10 वाजता स्थानिक भजनाचा कार्यक्रम होणार आहे .मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून श्री दत्त पूजा नामस्मरण सायकाळी 6 वाजता वारकरी हरिपाठ , रात्रौ आठ वाजता श्रीनादब्रह्म भजन मंडळ कसाल यांचा भजनाचा कार्यक्रम बुवा श्री सुंदर मेस्त्री 11 वाजता वाजता दत्तराम कडव आंबेगाव यांचे दत्त जन्मोत्सव कीर्तन रात्रौ 12 वाजता श्री दत्त जन्म सोहळा व महाआरती एक वाजता श्री मामा मोचेमाडकर कंपनीचे दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे ,तसेच बुधवार रोजी सकाळी सात वाजता श्री ची पूजा, दुपारी बारा वाजता महाआरती व दुपारी एक वाजता महाप्रसाद होणार आहे तरी भक्तगण यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.