मराठा समाजाच्यावतीने सर्वांसाठी १० व १२ वीतील विद्यार्थी व पालकांसाठी २१ जानेवारी सकाळी ९.५० ते ११.१५ वाजेपर्यंत विविध परीक्षांच्या पूर्वतयारीबाबत मोफत ऑनलाईन परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन


सिंधूदुर्ग प्रतिनिधी
परब मराठा समाजाच्यावतीने सर्वांसाठी १० व १२ वीतील विद्यार्थी व पालकांसाठी २१ जानेवारी सकाळी ९.५० ते ११.१५ वाजेपर्यंत विविध परीक्षांच्या पूर्वतयारीबाबत मोफत ऑनलाईन परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या ऑनलाईन परीक्षा मार्गदर्शन शिबिरात छबीलदास शाळेचे अध्यक्ष शैलेंद्र साळवी परीक्षेसाठी लागणारी मानसिकता, परीक्षेच्या अगोदर १ महिना अगोदर वेळेचे व्यवस्थापन, परीक्षेच्या अगोदर, आहार, झोप, घरातील वातावरण, परिणामीक गुणांवर लक्ष.
या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच यापुढे प्रत्येक महिन्याला परब मराठा समाजाच्यावतीने शिक्षण, व्यवसाय, उद्योग अशा अनेक विषयांवर ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिराच्या अधिक माहितीसाठी 9819098494 आणि 9819584666 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन परब मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.