भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ” २१ जुन – आंतरराष्ट्रीय योग दिन ” निमीत्ताने वेंगुर्लेत कॅम्प मैदानावर योग शिबिराचे आयोजन


वेंगुर्ले मंडल योग कार्यक्रम संयोजक पदी मा.नगराध्यक्ष राजन गिरप व सहसंयोजक पदी अँड. सुषमा खानोलकर यांची निवड
वेंगुर्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “२१ जुन – आंतरराष्ट्रीय योग दिन ” देशभरातील जनतेस विविध शिबीरात सहभागी होऊन साजरा करण्याचे आवाहन केले आहे .पंतप्रधान २१ जुन रोजी श्रीनगर येथे स्वत: योग शिबीरात उपस्थित राहणार असून , देश – विदेशातील करोडो जनतेस स्वस्थ जिवन जगण्याची प्रेरणा व संदेश देणार आहेत .
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनखुळे यांनी या कार्यक्रमासाठी प्रदेश संयोजक विश्वास पाठक व सहसंयोजक श्वेता शालिनी यांची निवड करुन संपुर्ण महाराष्ट्रात योग दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे .
भाजपा म्हणून प्रत्येक तालुक्यात योग शिबीराचे आयोजन करावे तसेच सर्व मोर्चा व प्रकोष्ठ ने जिल्हा स्तरावर एक योग शिबीर आयोजित करावे , याव्यतिरिक्त सार्वजनिक कार्यक्रम – शिक्षण संस्था , अन्य सामाजिक संस्थातर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व लोकप्रतिनिधीं सहभागी व्हावे , असे आवाहन केले आहे .
भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात या संदर्भात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून मा. नगराध्यक्ष राजन गिरप व सहसंयोजक म्हणून अँड. सुषमा खानोलकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली . तसेच तालुकास्तरावर वेंगुर्ले कॅम्प मैदानावरील तालुका क्रिडा केंद्रातील नवीन बॅडमिंटन हाॅल मध्ये दिनांक २१ जुन रोजी सकाळी ७ -०० ते ८ – ०० या वेळेत योग शिबीर घेण्याचे ठरविण्यात आले .
या शिबीरात भाजपा कार्यकर्त्यां सोबत खेळाडु , डाॅक्टर , वकिल , प्राध्यापक , शिक्षक , विविध संस्थांचे प्रतिनीधी सहभागी होणार आहेत . भाजपा तालुका कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व अँड. सुषमा खानोलकर , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मा.नगराध्यक्ष राजन गिरप , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर , महीला अध्यक्षा सुजाता पडवळ , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , मच्छिमार सेलचे दादा केळुसकर , महीला मोर्चाच्या श्रेया मयेकर – वृंदा मोर्डेकर – उर्वी गावडे , नगरसेवक प्रशांत आपटे , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , बुथ प्रमुख पुंडलिक हळदणकर , छोटु कुबल इत्यादी उपस्थित होते