संस्कार नॅशनल स्कूल निरवडे मध्ये प्रवेश घेतलेल्या “नवागतांचे” उत्साहात स्वागत

सावंतवाडी

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये 2024-2025 या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या पहिली व प्री प्रायमरी विभागातील नवीन विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागत करण्यात आले.


प्रवेशोत्सवानिमित्त शालेय परिसर सजवण्यात आला होता.प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत फुलांच्या वर्षावात औक्षण करून करण्यात आले.यावेळी शाळेचे अध्यक्ष नरपत जैन सर,संस्थेचे माजी अध्यक्ष मा. शेखर जैन सर, प्रशालेचे मुख्याध्यापक मा. हेमंत तानावडे सर यांनी मुलांचे स्वागत केले आणि शैक्षणिक वर्षांसाठी शुभेच्छा दिल्या .यावेळी प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.