

सावंतवाडी शहरात जुगार अड्ड्यावर पोलिसाची धडक कारवाई!, जुगार मटक्यावाल्यांचे धावे दणाणले
पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः कणकवलीत जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर पोलिसांची सिंधुदूर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी जुगार ,मटक्यावर कारवाई सुरू
सावंतवाडी :
सावंतवाडी येथे जुगार अड्ड्यावर पहाटे सावंतवाडी पोलिसांनी छापा टाकला. यात तीन व्यक्तींना पकडले मिळाले उर्वरित पोलिस येताच हे समजल्यावर पळून गेले.
पळून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. यात हेमंत शामराव रंकाळे वय 35वर्षे, रोहन लहू पाटील वय 22 , राहणार जिमखाना सावंतवाडी, पांडू बापू पवार वय 55 वर्षे., राहणार शिरोडा., तालुका वेंगुर्ला सध्या राहणार दळवी हॉटेल असे आहेत. यांना ताब्यात घेतले. मुद्देमाल कॅट, जुगारासाठी वापरलेले पैसे, जुगाराचा पाल, तसेच त्यांचे मोबाईल असा एकूण 35,000/ रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, माधुरी मुळीक, पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे, पोलीस शिपाई संभाजी पाटील, (चालक) चव्हाण त्यांनी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे
.





