गोवा बांबुळी हाॅस्पिटल येथे विष्णू गवस, दोडामार्ग यांना ह्रदय शस्त्रक्रियेचेवेळी बी पाॅझिटीव्ह रक्ताची तातडीची गरज असल्याने तब्बल बत्तीस वेळा रक्तदान करणारे ऑन काॅल रक्तदाते मंगेश माणगांवकर (होडावडे) व राहूल खरात (दांडेली-आरोस) यांनी त्वरीत GMC बांबुळी रक्तपेढी मध्ये जाऊन केलें रक्तदान

सावंतवाडी

गोवा बांबुळी हाॅस्पिटल येथे विष्णू गवस, दोडामार्ग यांना ह्रदय शस्त्रक्रियेचेवेळी बी पाॅझिटीव्ह रक्ताची तातडीची गरज असल्याने तब्बल बत्तीस वेळा रक्तदान करणारे ऑन काॅल रक्तदाते मंगेश माणगांवकर (होडावडे) व राहूल खरात (दांडेली-आरोस) यांनी त्वरीत GMC बांबुळी रक्तपेढी मध्ये जाऊन रक्तदान केले.

तसेच शिक्षिका तेजस्विता वेंगुर्लेकर आणि सचिन जाधव, कारीवडे हे सुद्धा रक्तदान करण्यासाठी गेले होते, पण काही तांत्रिक कारणांमुळे ते रक्तदान करु शकले नाहीत. चौघांच्याही या देवतूल्य सत्कार्याला मानाचा मुजरा. तसेच या पोस्टसाठी विशेष प्रयत्न करणार्‍या श्रीराम साईल, कारीवडे, आर्मीमॅन अजित सावंत, कारीवडे व स्वतः रक्तदात्यांना घेऊन जाणार्‍या आर्मीमॅन तुकाराम गावडे, परमे-दोडामार्ग यांचे विशेष आभारनातेवाईक यांनी मानले आहेत.
रक्ताची गरज तातडीने पूर्ण करणार्‍या रक्तदाते मंगेश माणगांवकर आणि राहूल खरात यांच्यासहीत रक्तदाता सचिन जाधव, तेजस्विता वेंगुर्लेकर मॅडम्, श्रीराम साईल, अजितजी सावंत, तुकारामजी गावडे आणि ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांचे नातेवाईकांनी आभार मानले.