मुख्यंमत्री माझी लाड़की बहिण योजनेचे पात्र लाभार्थी महिलेचे नोंदणी करण्यास सप्टेंबर 2024 पर्यत सुरु ठेवणे मान्यता


महीला भगिनींन मध्ये महायुती सरकार बद्दल समाधानाचे वातावरण
प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष – भाजपा सिंधुदुर्ग तथा मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना , सावंतवाडी विधानसभा क्षेत्र समिती सदस्य
वेंगुर्ला
राज्यातील महीलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात ” मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण ” योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे .
मुख्यंमत्री माझी लाड़की बहिण योजनेचे पात्र लाभार्थी महिलांची नोंदणी करण्यास राज्य सरकार ने सप्टेंबर 2024 पर्यत सुरु ठेवण्यास मान्यता दिली , तसेच याबाबत शासन निर्णय दि 2/9/2024 रोजी जारी करण्यात आला , यामुळे या निर्णयाचे महिला वर्गाने स्वागत केले असून बर्याच महीलांना या निर्णयाचा फायदा मिळणार असल्याने महीलांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
