सोनुर्ली येथील श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक सभेत नवनिर्वाचित कार्यकारिणी मंडळाची बिनविरोध निवड अध्यक्ष पदी दिगंबर सखाराम मोर्ये यांची करण्यात आली निवड


सोनुर्ली:
श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, सोनुर्ली यांच्या वार्षिक सभेत नव्या कार्यकारिणी मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत श्री. दिगंबर सखाराम मोर्ये यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. श्री. आनंद चंद्रकांत नाईक यांना उपाध्यक्षपदी, श्री. नारायण बापू मोर्ये यांना सचिवपदी, श्री. नागेश ननी गांवकर यांना सहसचिवपदी, तर सौ. भारती भदू गांवकर यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांमध्ये श्री. शंकर भिकाजी गांवकर, श्री. गोविंद सुकाजी धडाम, श्री. भरत जयराम गांवकर, श्री. लक्ष्मीदास चंद्रकांत ठाकूर, श्री. दीपक दिनकर नाईक, श्री. मुकुंद गोविंद परब, श्री. शरद जयदेव धाऊसकर, श्री. उदय दत्ताराम गाड, श्री. तेजस अभिमन्यू गांवकर, श्री. भूषण गंगाराम ओटवणेकर , श्री सदाशिव पांडुरंग राऊळ आणि सौ. आनंदी सिताराम गांवकर यांचा समावेश आहे.
मावळते अध्यक्ष श्री. अनंत मुकुंद परब यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी माऊली विद्यालय, सोनुर्लीचे मुख्याध्यापक श्री. अरुण तेरसे सर आणि शिक्षक श्री. पांडुरंग काकतकर सर, श्री. प्रदिप सावंत सर, श्री. नितीन गवंडळकर सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. राजेंद्र गांवकर, श्री. संतोष ओटवणेकर, श्री. बापू निर्गुण, श्री. संदीप जाधव ग्रामस्थ नंदू गावकर अन्य ग्रामस्थ यांनीही नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळाच्या या नव्या कार्यकारिणीमुळे शाळेच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

