ठळक घडामोडी

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळी जुगार अड्ड्याचा ठाकरे शिवसेनेकडून पर्दाफाश

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळी जुगार अड्ड्याचा ठाकरे शिवसेनाकडून पर्दाफाश

पुन्हा असे घडल्यास आधी फटके देऊ नंतर पोलिस ठाणे

रूपेश राऊळ उद्धवबाळासाहेब ठाकरे शिवसेनाविधानसभा प्रमूख

सावंतवाडी

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांसमोर जुगार लावला जात आहे. अशी भयानक गोष्ट समोर आली आहे.

परजिल्ह्यातील लोकांची इथे येऊन दादागिरी चालत आहे या पर्यटन ठिकाणीं लाखो पर्यटक इथे येत असताना अशा ठिकाणीं जुगार अड्डा लावला जात असेल आणि आमच्या निदर्शनास आल्यास पुढच्यावेळी फटके देऊ अन् नंतर पोलिस ठाणे गाठू असा इशारा उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिला.

कार्यालय पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती.
यावेळी ते म्हणाले या घटनेबाबत पोलिस निरीक्षक यांना कळवण्यात आले. ते बाहेरगावी असतानाही त्यांनी यावर तात्काळ कारवाई केली. मात्र, या पर्यटनस्थळी जुगार अड्डा चालू असताना त्या भागात कार्यरत असलेले तेथील पोलिस नेमकं करतात काय असा मोठा प्रश्न समोर आला आहे.? कोणाच्या वरदहस्ताने तो अड्डा पर्यटन स्थळी चालू आहे ? असा सवाल श्री.राऊळ यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. या पर्यटन स्थळाला बदनाम करण्याचा हा प्रकार होत आहे. हे प्रकार आम्ही सहन करणार नाही. परजिल्ह्यातील लोक जुगार लावून आपल्याकडे मस्ती करत असतील तर त्यांना शिवसैनिक सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

अवैध धंद्याविरोधात असणारे पालकमंत्री अशा पोलिसांवर कारवाई करणार का ?

अवैध धंद्याविरोधात असणारे पालकमंत्री अशा पोलिसांवर कारवाई करणार का ? असा सवालही त्यांना यावेळी केला. तर येथील पर्यटन व्यवसायिकांनी देखील असे प्रकार खपवून घेता नये. अन्यथा, तुमच्यावरही कारवाई होऊ शकते याची दक्षता राखावी असे आवाहन केले. तात्काळ कारवाई केल्याने पोलिस निरीक्षकांचे आभार मानले

परजिल्ह्यातील या लोकांचा वाली कोण ?

पर्यटनस्थळी पोलिस कर्मचारी असताना हे प्रकार घडतात कसे ? यांना पाठीशी कोण घालत ? असा सवाल उपस्थित करत परजिल्ह्यातील या लोकांचा वाली कोण ? हा खरा प्रश्न आहे. त्या खोलात न जाता परत असे प्रकार दिसले तर आम्ही तक्रारी करणार नाही. पहिली सगळं उद्ध्वस्त करणार, फटके घालणार, ॲक्शन नंतर पोलिस स्टेशन गाठणार असं मत त्यांनी व्यक्त केले.तसेच महावितरणचा कारभार दिवसेंदिवस ढासळत चालला आहे‌.
या गंभीर प्रश्नाकडे सरकारच लक्ष नाही. अधिक्षक अभियंतांनी आम्ही घेरले तेव्हा ते निरूत्तर होते. कंत्राटी पद्धतीने वायरमन भरले जात आहेत ही चुकीची पद्धत आहे‌. कंत्राटी काम कधीही चांगल्याप्रकारे होणार नाही. सावंतवाडी शहरात चार-चार तास लाईट जाते हे प्रकार दुर्देवी आहे. वेंगुर्ला शहरात मे महिन्यात तीन दिवस लाईट नव्हती. त्यामुळे ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल याचा विचार करावा असं मत श्री. राऊळ यांनी केले.

चांदा ते बांदा, सिंधुरत्न योजना गुंडाळली जाण ही आमदार दीपक केसरकर यांना चपराक – रूपेश राऊळ

चांदा ते बांदा, सिंधुरत्न योजना गुंडाळली जाण ही दीपक केसरकर यांना चपराक आहे‌. जनतेसाठी असलेल्या या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यात श्री. केसरकर अपयशी ठरले आहेत. या योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचे लक्षात आल्याने त्याला स्थगिती देत सरकारकडून अहवाल मागविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या पत्रकार परिषदेला उबाठा शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, विनोद ठाकुर, अशोक धुरी, प्रशांत बुगडे, भिवा गवस उपस्थित होते.