मुसळधार पडलेल्या पावसामुळे तळवडे होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक ठप्प

वेंगुर्ला

सिंधुदुर्ग जिल्यात आज मुसळधार पाऊस पडला या सततधार पडलेल्या पाऊसामुळे सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील नदीनाले याना पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली. सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्गावरील होडावडे पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे . वाहनचालक व प्रवाशी याचे मोठे हाल झाले .
सतत धार पडलेल्या पाऊसामुळे तळवडे नेमळे तळवडे मातोंड वाहतूक बंद झाली आहे. पुलाची उंची कमी असल्याने पुलावर पाणी येते. सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्गावरील होंडावडे तळवडे पुलावर पाणी आल्याने वाहतूक लगेच ठप्प होते त्यामुळे यापूलाची उंची वाढवावी अशी मागणी वाहनचालक व प्रवाशी वर्ग यांच्याकडून होत आहे .