

तळवडे मातोंड मार्गावर रस्त्यावरच रिक्षेसमोर गवा रेडा आल्याने रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी
तळवडे प्रतिनिधि
_तळवडे मातोंड मार्गावर रस्त्यावरच रिक्षेसमोर गवा रेडा आल्याने रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी
तळवडे मातोंड -मार्गावर अचानक रिक्षेसमोर गवा रेडा आल्याने रिक्षा चालकाचा रिक्षेवरील ताबा सुटल्याने रिक्षा (एम एच ०७ एच ६५६४) पलटी होऊन झालेल्या अपघातात रिक्षा चालक गंभीर झाला.हा अपघात शुक्रवार दि.५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास घडला.

रिक्षा चालक मातोंडहुन तळवडे मार्गे जातं असता अचानक गवा रेडा रिक्षेसमोर आला व चालक घाबरल्याने त्यांचा वाहनावरील ताबा सुटला व रिक्षा पलटी झाली. या अपघातात रिक्षा चालक रविंद्र यशवत दळवी यांना दुखापत झाली आहे.
सावंतवाडी,वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यात गव्या रेड्यांच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकरी, वाहनचालक त्रस्त झाले असून वनविभागाने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना करावेत अशी मागणी जोर धरत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या गवा रेड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे पण हे गवा रेड्याचां वाहन चालक व शेतकरी वर्ग यांची डोकेदुखी बनवत आहे याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी ग्रामस्थ व वाहन चालक यांच्याकडून होत आहे अजून किती लोकांना हे गवे रेडे जखमी करणार,बळी घेणार आहेत. गवेरेडे याच्याकडून होणारी नुकसान भरपाई संबंधित वन खात्याने द्यावी अशी मागणी होत आहे. यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.






