होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव 28 नोव्हेंबर रोजी

सावंतवाडी प्रतिनिधि

होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव 28 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे.

श्री देव क्षेत्रपालेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान असून तसेच स्वयंभू देवस्थान असून प्रत्येक भक्तगण या देवाच्या वार्षिक उत्सवाला गर्दी करतात. श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाच्या
दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी यावेळी या वार्षिक उत्सवाला होते.

या जत्रोत्सव निमित्त दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार असून भाविकांनी ,रसिक वर्गानी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.