तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी सद्गुरु दर्शन सोहळ्याचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधि

तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी सद्गुरु दर्शन सोहळ्याचे आयोजन आज दिनांक 26 नोवेंबर 2023 रोजी करण्यात आले आहे. ओम श्री परमपूज्य सद्गुरु फलाहारी महाराज यांचे आगमन हरिहर सदन तळवडे येथे होणार आहे.

यावेळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळी आठ वाजता महाराजांचे आगमन ,दहा वाजता पाद्यपूजा, अकरा वाजता सत्यनारायण महापूजा ,एक वाजता आरती व तीर्थ प्रसाद, दोन वाजता महाप्रसाद ,चार वाजता परमपूज्य फुलहारी महाराजांची मिरवणूक म्हाळईवाडी ते सिद्धेश्वर मंदिर पर्यंत तसेच रात्री नऊ वाजता भाविकांचे भजन व आरती कार्यक्रम होणार आहे, तसेच सोमवार दिनांक 27 नोवेंबर 2023 रोजी सकाळी आठ वाजता पाद्यपूजा ,आरती , दुपारी तीर्थप्रसाद होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अतरेकर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.

तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अर्जुन हरी आचरेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.