ठळक घडामोडी

तुषार वालावलकर कुटुंबियांच्यावतीने शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेस कलर प्रिंटर भेट

तुषार वालावलकर कुटुंबियांच्यावतीने शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेस कलर प्रिंटर भेट

सावंतवाडी :

मळगाव येथील तुषार सुरेश वालावलकर व त्यांचे कुटुंबीय सुरेखा सुरेश वालावलकर, सुजाता सुरेश वालावलकर यांच्यावतीने शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेस कलर प्रिंटर भेट देण्यात आला.
तन्वी तुषार वालावलकर यांच्या हस्ते प्रिंटर शाळेस प्रदान करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, अस्मिता गोवेकर, वर्षा गवस, सीमा सावंत, गौरी रेडकर, व्यवस्थापन समिती सदस्य स्वरा वारंग, एकनाथ गावडे, शिक्षण प्रेमी विजय ठाकूर, माजी विद्यार्थी प्रवीण नाईक आदी उपस्थित होते.
मुलांनी शाळेत मिळणाऱ्या या सोयी सुविधांचा उपयोग करून जास्तीत यश यश संपादन करावे, ये यश संपादन करताना शाळेचे नाव व पर्यायाने गावाच नाव मोठ कराव, असे तन्वी वालावलकर यांनी सांगत यापुढेही शाळेने गरज असेल तेव्हा आम्हाला हक्काने सांगावे, आम्ही नक्की मदत करू, असा शब्द दिला. शाळेस केलेल्या या मदतीबद्दल मुख्याध्यपिका अनुराधा सुर्वे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर यांनी वालावलकर कुटूंबियांचे आभार व्यक्त केले.