

नगरपरिषदेला निधी कोण देतं” नगर विकास खात या नगर विकास खात्याचा मंत्री कोण मी त्यामुळे निधीची काळजी करू नका भरपूर निधी देईन हा या एकनाथ शिंदे चा वादा आहे
सावंतवाडीचा विकास हाच आपला ध्यास–मा.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री
“नगरपरिषदेला निधी कोण देतं” नगर विकास खात या नगर विकास खात्याचा मंत्री कोण मी त्यामुळे निधीची काळजी करू नका भरपूर निधी देईन हा या एकनाथ शिंदे चा वादा आहे
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान सावंतवाडी गांधी चौक येथे प्रचाराच्या जाहीर सभेत बोलताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले “नगरपरिषदेला निधी कोण देतं” नगर विकास खात कोणाकडे आहे नगर विकास खात्याचा मंत्री कोण आहे तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे त्यामुळे कोणी येऊन सांगेल निधी देणार नाही तर अशा भूलथापांना बळी पडू नका या सावंतवाडी नगर परिषदेला पाहिजे तेवढा निधी माझ्या खात्याच्या माध्यमातून मी देईन चिंता करू नका. तुमचं एक मत इतिहास घडवणार आहे या कोकणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत 8 आमदार या कोकणाने शिवसेनेला दिले आहेत हा सुद्धा एक इतिहास कोकणी जनतेने घडवला आहे सावंतवाडीकरांचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. तुम्ही संकल्प केला आहे विकास म्हणजे शिवसेना विकास म्हणजे धनुष्यबाण आणि विकास म्हणजे एकनाथ शिंदे. तुम्ही शब्द द्या तुमचा शब्द खाली पडू देणार नाही एकनाथ शिंदेचा वादा आहे तीन तारीखला फटाके फोडायचे आहेत आणि या सावंतवाडीवर विकासाचा भगवा झेंडा डौलाने फडकवायचा आहे.





