कुडाळ तालुक्यातील झाराप या ठिकाणी सप्तरंग कला मंच होडावडे यांचा ब्रम्हांडनायक नाटय प्रयोग 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादरीकरण होणार

कुडाळ

श्री गणेश मंदिर झाराप कुंभारवाडी वरचीवाडी या ठिकाणी माघी गणेश जयंतीनिमित्त शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी श्री पांडुरंगाची पालखी, टेंबे स्वामींची पालखी असा सुवर्ण मध्य सोहळा आयोजित केला आहे ,त्यानिमित्त रात्री9 वाजून 30 मिनिटांनी सप्तरंग कला मंच होडावडे यांचा श्री स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित महान पौराणिक संगीत दोन अंकी ट्रिकसिन नाटक ब्रह्मांडनायक नाटय प्रयोग आयोजित करण्यात आला आहे .

याचा रसिक वर्ग यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .सप्तरंग कला मंच होडावडे यांच्यामार्फत गोवा व महाराष्ट्रात अनेक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले आहेत.याला उस्पूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक यांच्यामार्फत करण्यात आले आहे.