संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे स्कूलमध्ये राबविण्यात आला खाद्य महोत्सव व फनी गेम उपक्रम!खाद्य महोत्सवाची खाद्य प्रेमींसाठी लज्जत मेजवानी


निरवडे
संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे या प्रशालेत खाद्य महोत्सव व फनी गेम हा एक अतिशय आगळावेगळा असा उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
या महोत्सवात इयत्ता चौथी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी स्व हाताने बनवलेल्या खाद्यपदार्थांची दुकाने लावण्यात आली होती. या खाद्य महोत्सव उपक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री पंचम खेमराज महाविद्यालयमधील अर्थशास्त्र विभाग प्राध्यापक सौ. निलम धुरी मॅडम लाभल्या होत्या. तसेच मळगाव केंद्रप्रमुख श्री शिवाजी गावित व निरवडे ग्रामपंचायत सरपंच सौ. सुहानी गावडे उपस्थित होत्या. उपस्थित सर्व प्रमुख अतिथींचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. हेमंत तानावडे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या खाद्य महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते. त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांनी प्रत्येक खाद्य दुकानावर जाऊन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या उत्कृष्ट व चवदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचे कौतुक केले.
मळगाव केंद्रप्रमुख श्री.शिवाजी गावित सर यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेत उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी आदरणीय सौ .नीलम धुरी मॅडम यांनीही सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमाबद्दल लाखमोलाचे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. निरवडे ग्रामपंचायत सरपंच सुहानी गावडे मॅडम सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत भविष्यातही असेच उत्तमोत्तम उपक्रम राबविले जावेत यासाठी अपेक्षा व्यक्त केल्या. उपस्थित सर्व पालकांनी ही विद्यार्थ्यांनी बनवलेल्या खाद्यपदार्थांची चव चाखत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री हेमंत तानावडे सर यांनीही सर्व विद्यार्थ्यांच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे या प्रशालेचे चेअरमन डॉ. श्री. शेखर जैन सर यांनीही सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन खाद्य महोत्सवासाठी उपस्थित सर्व खाद्यप्रेमी पालकांनाही शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.हेमंत तानावडे सर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले होते.



