ठळक घडामोडी

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये ‘ग्रीन कलर डे’ चा उत्साहात साजरा

सावंतवाडी

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे मधील प्री-प्रायमरी विभागातील चिमुकल्यांनी नुकताच ‘ग्रीन कलर डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला. निसर्गातील हिरव्या रंगाचे महत्त्व आणि पर्यावरणाचे रक्षण याविषयी जागृती करण्यासाठी हा दिवस आयोजित करण्यात आला होता.

या खास दिवसासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले होते. शाळेचा परिसर हिरव्या फुग्यांनी आणि पानांच्या सजावटीने सजवण्यात आला होता, ज्यामुळे संपूर्ण वातावरण हिरवेगार झाले होते.
विद्यार्थ्यांनी विविध हिरव्या भाज्या, फळे, झाडांची पाने आणि पक्षी ओळखले. शिक्षकांनी त्यांना पर्यावरणाचे रक्षण कसे करावे, झाडे का लावावीत आणि हिरव्या रंगाचे आपल्या जीवनातील महत्त्व काय आहे, याबद्दल सोप्या भाषेत माहिती दिली. मुलांनी हिरव्या रंगावर आधारित गाणी गायली आणि कविता म्हटल्या.
या उपक्रमामुळे लहान मुलांना रंगांची ओळख झालीच, पण त्यासोबतच त्यांना पर्यावरणाविषयी एक चांगला संदेश मिळाला. हा दिवस मुलांसाठी खूप आनंददायी आणि ज्ञानवर्धक ठरला.
अशाप्रकारे मोठ्या उत्साहात संस्कार नॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांनी ग्रीन कलर डे साजरा केला.

यावेळी शाळेचे शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते