

सावंतवाडी नगरपरिषदेवर शिवसेनेचे नगराध्यद साठी उमेदवारी अर्ज दाखल! माजी मंत्री तथा आमदार दिपक केसरकर उपस्थित!
शक्तिप्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज (ॲड निता कविटकर-सावंत यांनी भरला अर्ज)

सावंतवाडी-वेंगुर्ला नगरपरिषद: युती-स्वबळाचा तिढा कायम!
सावंतवाडी आणि वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आमदार दीपक केसरकर यांनी आज महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. सावंतवाडी नगरपरिषदेवर शिवसेनेचे नगराध्यद पद शिवसेनेकडे राहावे असे स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, वेंगुर्ला नगरपरिषद नगराध्यक्ष पद भाजपास सोडण्यास पक्ष तयार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
युतीचा प्रयत्न, पण स्वबळाची तयारी
आमदार केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले की, ‘महायुती’ व्हावी यासाठी आजही आम्ही आग्रही आहोत. ते म्हणाले:उद्यापर्यंत चर्चा करता येईल.”अन्यथा आम्ही स्वबळावर लढू, तशी आमची तयारी आहे.”काही गावांवर आमच्या चढाओढ आहेत. मात्र त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेऊ.” माडखोल पंचक्रोशीतील अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत (तेव्हाची शिवसेना) प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना केसरकर उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख नीता कवितकर, झोवियर फर्नांडिस, परीक्षित मांजरेकर, प्रेमानंद देसाई, सूरज परब, बंटी पुरोहित, दिनेश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्यापर्यंत अंतिम निर्णय अपेक्षित
केसरकर यांनी पुढे बोलताना सांगितले की, “या ठिकाणी आम्ही महायुती करण्यासाठी तयार आहोत. त्या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही, तसेच भाजपकडून अंतिम निर्णय सांगण्यात आलेला नाही.”
त्यांनी जोर देत सांगितले की, “उद्यापर्यंत आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. त्यानंतर सुद्धा वाटाघाटी सुरु राहतील. परंतु सध्या फॉर्म भरणे महत्त्वाचे असल्याने आम्ही तयारी करत आहोत. प्रसंगीमाहिती झाली नाही तर आम्ही स्वबळावर लढणार आहोत.”
एकंदरीत, सावंतवाडीत शिवसेनेची पकड कायम ठेवत वेंगुर्ला भाजपास सोडण्याची तयारी दर्शवत, आमदार केसरकर यांनी युतीसाठी दार खुले ठेवले आहे, पण फॉर्म भरण्याच्या अंतिम टप्प्यात त्यांनी स्वबळावर लढण्याची ठोस तयारी दर्शवली आहे.





