ठळक घडामोडी

गणित संबोध परीक्षेत संस्कार नॅशनल स्कूल निरवडे चे घवघवीत यश

निरवडे

गणित संबोध परीक्षेत संस्कार नॅशनल स्कूल् निरवडे घवघवीत यश…
दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत पाचवी व आठवीसाठी गणित संबोध परीक्षा घेतली जाते यावर्षीच्या गणित संबोध परीक्षेत आपल्या शाळेतील पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यानी चांगले यश संपादन केले आहे इयत्ता पाचवी व आठवी मधील सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. इयत्ता पाचवी मधून दहा विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले तर इयत्ता आठवी मधून 12 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे गणित शिक्षक श्री पांडुरंग मिशाळ सर, सौ.रुची देसाई मॅडम व श्री रुपेश सावंत यांचे मुख्याध्यापक व संस्थेने कौतुक केले आहे.