ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांनी रक्तदान करुन वाचविले रुग्णाचे प्राण -ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांचे नातेवाईकांनी मानले आभार


सावंतवाडी
. सिव्हिल हॉस्पिटल, सिंधुदुर्ग येथे विष्णू जाधव (निरवडे-कोनापाल) या पेशंटला ए पॉझिटिव्ह रक्तगटाच्या तीन बॅग्स पुरविल्या होत्या. परंतु तेवढ्यानेही न भागल्याने ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे नियमित ऑन कॉल रक्तदाते आदेश उर्फ जयराम जाधव यांनी संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रक्ताच्या गरजेची माहिती संस्थेच्या समूहावर पाठविली.
परंतु वादळ, वारा, पाऊस सुरु असल्याने अजून रक्तदाते मिळण्यासाठी व मिळाले तर ते रक्तपेढीपर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण होत होत्या, अशावेळी मग आज दि. २४ मे २०२५ रोजी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांनी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये जाऊन इमर्जन्सी रक्तदान केले. जातायेता वारापाऊस असतानाही ते संस्थेचे खजिनदार सिद्धार्थ पराडकर यांना घेऊन गेले आणि त्यांनी आपले आतापर्यंतचे सतरावे रक्तदान केले.
ही पोस्ट पूर्ण होण्यासाठी संस्थेचे ऑन कॉल रक्तदाते आदेश उर्फ जयराम जाधव यांनी प्रयत्न केले. तातडीची गरज असताना ताबडतोब येऊन रक्तदान केल्याबद्दल रक्तदाते बाबली गवंडे यांच्यासहीत ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांचे नातेवाईकांनी आभार मानले आहेत.