

तळवडे अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून तळवडे गावातील अनेक लोकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली हि बाब गौरवास्पद ! मनीष दळवी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष / तळवडे अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा रौप्यमहोत्सव सोहळा सत्कार दिमाखात साजरा

तळवडे अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून तळवडे गावातील अनेक लोकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली हि बाब गौरवास्पद ! मनीष दळवी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष / तळवडे अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा रौप्यमहोत्सव सोहळा सत्कार दिमाखात साजरा
सावंतवाडी प्रतिनिधी
तळवडे अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून तळवडे गावातील अनेक लोकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली हि बाब गौरवास्पद असे मत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक चे अद्यक्ष मनीष दळवी यांनी तळवडे येतेतळवडे अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, तळवडे (तालुका सावंतवाडी) यांचा रौप्यमहोत्सव व सत्कार सोहळा कार्यक्र्मवेळी मत व्यक्त केले. यावेळी या संस्थेच्या कामकाज याबाबत समाधान व्यक्त केले पण आज या तळवडे अर्बन को ऑप सोसायटीचा विस्थार करण्यासाठी किंवा एखादा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी सिंधुदर्ग जिल्हा बँक आपणास सदैव सहकार्य करेल अशी ग्वाही दिली . तळवडे अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, तळवडे (तालुका सावंतवाडी) यांचा रौप्यमहोत्सव व सत्कार सोहळातळवडे अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, तळवडे (तालुका सावंतवाडी) यांचा रौप्यमहोत्सव व सत्कार सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या मागील २५ वर्षांतील कार्याचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त हा सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला .


आमदार तथा माजी शेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाइन शुभेच्या
याकार्यक्रमवेळी आमदार तथा माजी शेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाइन शुभेच्या दिल्या . आपले सहकारी दिवंगत प्रकाश परब यांनी स्थापन केलेल्या तळवडे अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीची प्रगती चांगली असून हे यश या सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, सल्लागार याचे आहे, याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. तळवडे गावाने आपणास नेहमी राजकीय काळात सहकार्य केले त्यामुळे या गावाच्या सर्वांगीण विकासाकरता आपण कटिबद्ध आहे असे मत यावेळी व्यक्त केले


या सोहळ्याचे उद्घाटनज सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी याच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष विलास परब उपाध्यक्ष नारायण परब यांनी व पदाधिकारी आणि संचालक मंडळाने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. या वेळी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेणारा अहवाल विलास नाईक यांनी सादरकेला. त्यात संस्थेने सभासदांच्या हितासाठी राबवलेल्या विविध योजना, कर्जवाटप, ठेवी आणि सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली.
या सोहळ्यात अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री विद्याधर परब सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक , डॉ प्रसाद देवधर भगीरथ प्रतिष्ठान ,श्री प्रमोद गावडे खरेदी विक्री संघ सावंतवाडी ,श्री बाळ परब जिल्हा उपनिबंधक, श्री सुजय कदम सहाय्यक निबंधक सावंतवाडी, श्री आर टि चौगुले सा नि स प्रथम श्रेणी अधिकारी वेंगुर्ला ,श्री आत्माराम राऊळ .अद्यक्ष सहकारी कौल कारखाना नेमळे , रुपेश राऊळ, सौ वनिता मेस्त्री तळवडे सरपंच , श्री बाबुराव परब विकास सेवा सोसायटी , श्री उदय परब तळवडे व्यापारी संघ अध्यक्ष , श्री सुनील परब तळवडे देवस्थान प्रमुख मानकरी,सुरज परब , उमा परब ,संस्थेचे अध्यक्ष विलास परब उपाध्यक्ष नारायण परब , विलास नाईक सल्लागार तळवडे अर्बन को ऑप सोसायटी, दिलीप मालवणकर माजी अद्यक्ष अर्बन को ऑप सोसायटी, विनोद वराडकर व्यस्थापक , यावेळी व्यापीठावर उपस्थित होते . यावेळी उभाठा सेनेचे तालुका प्रमुख मायकल डिसोझा चंद्रकांत कासार, रमेश गावकर यांनी सस्था अध्यक्ष यांना शुभेच्या दिल्या तसेच यावेळी उपस्थित मान्यवर यांनी संस्थेच्या पारदर्शक कारभाराचे, आर्थिक शिस्तीचे आणि सभासदांशी असलेल्या सौहार्द पूर्ण संबंधांचे विशेष कौतुक केले. संस्थेने २५ वर्षांत केलेली प्रगती ही सहकाराचे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमात संस्थेच्या स्थापनेपासून महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सभासदांचा आणि विशेष कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेच्या यशस्वी वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.आज सहकारी सस्था टिकविणे कठीण आहे आज फग्रमीण भागात तळागाळा पर्यत सहकारी सावस्था पोहचू शकतात सर्वसामान्य शेतकरी याची नाला त्याचाशी जोडली आहे असे मत डॉ प्रसाद देवधर यांनी व्यक्त केले .
या कार्यक्र्मवेळी संचालक रवींद्र काजरेकर ,शरद परब , रघुनाथ गावडे , वसंत पडते , सुभाष रेडकर ,सगुण जाधव , उमा परब , शामल रेडकर , तानी संचालकी विलास नाईक , व्यवस्थापक विनोद वराडकर , लिपिक दिनेश परब ,मधुकर परब तसेच सोसायटीचे सभासद ग्रामस्थ मोठ्या सःख्येने उपस्थित होते . याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण परब तळवडे अर्बन को ऑप सोसायटी,यांनी केले आणि आभार प्रदर्शनाने सोहळ्याची सामाजिक कार्यकर्ते संजू पैई यांनी केले . यावेळी तळवडे अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने यशस्वीपणे २५ वर्षे पूर्ण केल्याने सभासदांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.
तळवडे अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, रौप्यमहोत्सव व सत्कार सोहळा कार्यक्रमावेळी वेळी स्मरणिकेचे प्रकाशन करताना मनीष दळवी अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँक यावेळी विद्याधर परब सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक , डॉ प्रसाद देवधर ,श्री प्रमोद गावडे खरेदी विक्री संघ सावंतवाडी ,श्री बाळ परब जिल्हा जिल्हा उपनिबंधक, श्री सुजय कदम सहाय्यक निबंधक सावंतवाडी, श्री आर टि चौगुले सा नि स प्रथम श्रेणी अधिकारी वेंगुर्ला ,श्री आत्माराम राऊळ .अद्यक्ष सहकारी कौल कारखाना नेमळे , संस्थेचे अध्यक्ष विलास परब, उपाध्यक्ष नारायण परब ,सौ वनिता मेस्त्री तळवडे सरपंच , , श्री बाबुराव परब विकास सेवा सोसायटी , श्री उदय परब तळवडे व्यापारी संघ अध्यक्ष , श्री सुनील परब तळवडे देवस्थान प्रमुख मानकरी,सुरज परब , उमा परब ,, विलास नाईक सल्लागार तळवडे अर्बन को ऑप सोसायटी, दिलीप मालवणकर माजी अद्यक्ष अर्बन को ऑप सोसायटी, विनोद वराडकर व्यस्थापक , यावेळी व्यापीठावर उपस्थित होते







