

वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला च्या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या सहा खेळात विभाग स्तरावर निवड.
वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला च्या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या सहा खेळात विभाग स्तरावर निवड.
वेंगुर्ला
वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला च्या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या सहा खेळात विभाग स्तरावर निवडझाली आहे. लांब उडी हर्ष उदय म्हाडदळकर जिल्हास्तर स्पर्धेत प्रथम क्रमांक, 100 मीटर हर्डल्स राज राममिलन प्रजापती जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय,800 मीटर धावणे, विधी विनोद परब जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम,बुद्धिबळ विठ्ठल रामचंद्र कोरगावकर जिल्हास्तरीय स्पर्धेत चौथा क्रमांक , लांब उडी मान्यता संदीप पेडणेकर जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय, अरमान अब्दुल शमी शेख, कबड्डी निवड चाचणीत सिलेक्शन 17 वर्षाखालील गटात
या वरील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना श्री एस ए बिडकर सर मुख्याध्यापक श्री आर व्ही थोरात सर,पर्यवेक्षक ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच यांना मार्गदर्शन श्री आर डी केरलेकर सर आणि श्री टी आर गायकवाड सर सौ संजीवनी चव्हाण मॅडम तसेच पालक श्री संदीप पेडणेकर आणि दिलीप मालवणकर यांचे मार्गदर्शन लाभले.






