महायुतीत कुणी अपशकून करण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेणार नाही ; केंद्रिय मंत्री नारायण राणे


वैयक्तिक स्वार्थासाठी कुणी स्टेटस ठेवत असेल तर ते चुकीचे
सावंतवाडी
सावंतवाडी महायुतीचा काम सुरळीत व गुण्यागोविंदाने सुरू आहे, असे असताना वैयक्तिक स्वार्थासाठी स्टेटस ठेवून महायुतीत अपशकून केल्यास सहन करून घेतला जाणार नाही असा इशारा केंद्रीय मंत्री भाजप नेते नारायण राणे यांनी आज सावंतवाडी येते शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना माजी आमदार राजन तेली यांचे नाव न घेता दिला.
माजी आमदार राजन तेली यांनी कोणाच्यातरी हट्टा मुळे दोन वेळा सभा रद्द करावी लागली यावेळी मी दिलगीर आहे अशा प्रकारचा स्टेटस ठेवला होता व सदरचा स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, याच पार्श्वभूमीवर आज केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता असा स्टेटस कोणी जर ठेवला असेल तर ते चुकीचे आहे, युतीचे महायुती गुण्यागोविंदाने नांदत असताना कोणी चुकीचे काम करत असेल तर सहन करणारं नाहि असा इशारा सावंतवाडी याठिकाणी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मंत्री नारायण राणे यांनी मत व्यक्त केले.