

तळवडे परबवाडीमध्ये ग्रामस्थ याच्या पाठपुराव्यामुळे नविन १०० (KVA) ट्रान्सफॉर्मर आला विद्युत महामंडळ याच्याकडून आला बसविण्यात -कार्यकारी अभियंता कुडाळ वसावंतवाडी सहाय्यक अभियंताया यांचे मानले ग्रामस्थ यांनी आभार!
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे परबवाडीमध्ये ग्रामस्थ याच्या पाठपुराव्यामुळे नविन १०० (KVA) ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला , यावेळी सहकार्य करणाऱ्या सर्व विद्युत महामंडळ अधिकारि व कर्मचारी याचे ग्रामस्थ यांनी आभार मानले.
यावेळी श्रीफळ वाढवून उद्घाटन करुन तो जोडण्यात आला , यावेळी त्यावेळी परबवाडीतील आपली सर्व मंडळी उपस्थित होती, आपण केलेल्या प्रयत्नांना हे मोठे यश आहे असे मत त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. यात कोणत्याही राजकारणी माणसाची मदत न घेता आपल्या एकजुटीने हे काम आम्ही सर्वांनी करुन घेतलं आणि ते दोन महिन्यांचा आत सांगितल्याप्रमाणे चतुर्थीपुर्वी कार्यकारी अभियंता कुडाळ वनमोरे तसेच सावंतवाडी सहाय्यक अभियंता श्री.खांडेकर तसेच तळवडे गावचे श्री.गवळी वायरमन , श्री आचरेकर वायरमन यांनी करुन दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

या नूतन ट्रांसफार्मर उद्घाटनप्रसंगी परबवाडीतील दिनेश परब,रविंद्र काजरेकर,प्रशांत परब, विलास नाईक, संदिप परब, अर्जुन नाईक, प्रविण नाईक,प्रताप परब,समिर काजरेकर, संदेश कांडरकर,पपन कांडरकर, सुहास परब, चंद्रकांत रेडकर, राजेश नाईक, विकास नाईक, नामदेव परब, सुनिल परब, सुशिल परब,विनित परब, हेमंत परब, प्रदिप काजरेकर,संजय परब,संतोष परब, कुळकर,दुर्गेश पवार, अजित कांडरकर, प्रथमेश परब,वैभव नाईक,साहिल परब, संदिप कांडरकर , संदिप देसाई, तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.





