महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी घेतली राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट


मुंबई
माजी आमदार राजन तेली यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून सावंतवाडी विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आज राजन तेली यांनी भेट घेतली. त्यांच्या सोबत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांची उपस्थिती होती.

सावंतवाडी विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुकी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राजन तेली यांची सीट निश्चित करण्यात आल्यामुळे या निवडणुकीत राजन तेली यांना सर्व पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा प्रयत्न करावा असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश दिला.

