युतीकडून मंत्री दीपक केसरकर तर आघाडी करून माजी आमदार राजन तेली यांच्या सहबंडखोरी केलेले अर्चना घारे-परब, विशाल परब निवडणूक रिंगणात चौरंगी होणार लढत


सावंतवाडी विधानसभा निवडणुकीसाठी एकूण सहा
उमेदवार रिंगणात
सावंतवाडी मतदारसंघात एकूण २ लाख ३० हजार २ एवढे मतदार
सावंतवाडी
सावंतवाडी विधानसभा निवडणुकीसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये महायुतीकडून दीपक केसरकर तर आघाडी करून राजन तेली यांच्यासह बंडखोरी केलेले अर्चना घारे-परब, विशाल परब, सुनील पेडणेकर आणि दत्ताराम गावकर या अपक्षांचा समावेश आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अर्चना घारे परब तसेच महायुतीच्या विशाल परब यांनी बंडोखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी या दोघांकडून आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला नसल्याने सावंतवाडी मतदारसंघांमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

सावंतवाडी मतदारसंघात एकूण २ लाख ३० हजार २ एवढे मतदार
सावंतवाडी मतदारसंघात एकूण २ लाख ३० हजार २ एवढे मतदार आहेत. यात महिला मतदार 1 लाख 15 हजार
354 तर पुरुष मतदार 1 लाख 14 हजार 648 एवढे
आहेत. प्रत्येक तालुक्याचे मतदार लक्षात घेता दोडामार्ग
मध्ये 40 हजार 754 वेंगुर्ल्यामध्ये 67 ह॒जार 985 तर
सावंतवाडीमध्ये सर्वात जास्त म्हणजे 1 लाख 21 हजार
263 एवढे मतदार आहेत, उमेदवार निश्चित झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे बाटप केले. यावेळी ते म्हणाले, सहा उमेदवारासह नोटा पकडून एकूण सात बटणे
मतदान यंत्रावर असणार आहेत. निवडणुकीच्या आधी
दोन दिवस म्हणजेच 18 तारीख ला सायंकाळी सहा
वाजता निवडणुकीचा प्रचार संपणार आहे. 19 रोजी
सकाळपासून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्र
पाठवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रत्येक
उमेदवाराने प्रचारासाठी आपल्या प्रतिनिधीकडून
परवानगी घेणे गरजेचे आहे. मतदान हे २० रोजी
सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे.
यासाठी आवश्यक ती पोलीस बंदोबस्त तसेच इतर
यंत्रणा राबविण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी
दिली.

