

MCZMA कमिटीला केंद्राची मंजुरी;-पर्यावरणाच्या निमित्ताने येणारे सर्व अडथळे दूर!पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती मागणी!केंद्रीयमंत्री भुपेंद्र यादव यांची घेतली होती भेट सिंधुदुर्गातील अनेक प्रलंबित विकास कामांना मिळणार गती
पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास
कणकवली;

सार्वजनिक बांधकाम विभाग, पत्तन विभागाची अनेक निधीसह मंजूर असलेली कामे आता mczma कमिटी मुळे मार्गी लागणार आहेत.अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
असंख्य विभागाचे जे काही प्रकल्प जे प्रकल्प किंवा निधी फक्त या MCZMA कमिटीमुळे जे पुढे गेले नाही ते यावेळी मंत्री नितेश राणे यांनी वाचून दाखवले.यात पत्तन विभागाची 18 काम आहेत 122 कोटी निधी उपलब्ध आहे. अर्थसंकल्पीय 42 काम आहेत शंभर कोटी निधी आहे. सार्वजनिक बांधकामची जवळपास 50 कोटीची कामे प्रलंबित होती. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे जवळपास 50 लक्ष कामे २०२२ प्रलंबित आहेत. मालवण नगरपरिषद पासून वेंगुर्ला नगरपरिषद मध्ये अशा अनेक ठिकाणी या सी आर झेड मुळे अडकली आहेत. पर्यटन विभाग ज्याच्या अंतर्गत समुद्रकिनारी उभ्या कराव्या लागणाऱ्या शासकीय सोयीसुविधा निर्माण करता येत नव्हत्या. कारण ही कमिटी नसल्यामुळे ही कामे अडली होती.एमटीडीसीच्या जमिनी सी आर झेड च्या 200 मीटरच्या मध्ये येतात तिथे तात्पुरता सर्विस टेन्ट हाऊस कोकणी हाऊ निर्माण होणार करता येणार आहेत.
गजबादेवी देवस्थानच्या येथे विकास कामांसाठी आमदार रवींद्र फाटक यांनी निधी आणला संरक्षण भिंत व इतर कामांसाठी 24 कोटी आणून ठेवलेले ते काम पुढे जात नाही ते आता या समिती गठीत झाल्यामुळे अनेक प्रश्न आता सुटणार आहेत. त्याला चालना भेटेल आणि ही काम आता लगेच त्या दृष्टिकोनातून पूर्ण होतील असा विश्वास यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केले.





