तळवडे गावातील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रोत्सव थाटात साजरा


सामाजिक कार्यकर्ते बंड्या परब यांचे कार्य मोलाचे !
अभिनेते संजय कर्पे
अनेक मान्यवरांनी घेतले श्री देव दाळकर देवाचे दर्शन,सिने अभिनेते भाऊ कदम यांची खास उपस्थिती
सावंतवाडी
तळवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते बंड्या परब यांचे कार्य मोलाचे आहे. कोकण भागात धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने साजरे केले जातात. मी ह्या तळवडे गावात गतवर्षी आलो होतो.

येथील दाळकर देवांच्या दर्शनासाठी यावर्षी देवाच्या कृपाशीर्वादाने पुन्हा आलो आहे, असे मत सिने अभिनेते संजय कर्पे यांनी तळवडे येथील श्री देव दाळकर देवाच्या वार्षिक जत्रोत्सव वेळी मत व्यक्त केले.
यावेळी त्यांचा बंड्या परब मित्र मंडळाच्य सिने अभिनेते भाऊ कदम व संजय कर्पे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


यावेळी युवा उद्योजक व भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष विशाल परब ,सिने सिने अभिनेते भाऊ कदम, बंड्या परब, सुजित कोरगावकर, नंदू गावडे ,शैलेश मेस्त्री, विजय पांचाळ, बबन रेडकर, रमेश पाटील ,तसेच अन्य मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.