माहिती प्रदर्शनातून तंत्रज्ञानाचा विस्तार

छत्रपती शिवाजी कृषी महविद्यालय किर्लोस – ओरोस येथील कृषी कन्यांनी होडावडे गावामध्ये ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी माहिती प्रदर्शनाचे अतर्गत केलें आयोजन


वेंगुर्ला
छत्रपती शिवाजी कृषी महविद्यालय किर्लोस – ओरोस येथील कृषी कन्यांनी होडावडे गावामध्ये ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विविध कृषी माहिती प्रदर्शनाचे आयोजन केले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते झाले.या वेळी कृषी कन्यांनी विविध पिकांच्या सुधारित जाती, अझोला उत्पादन, विविध पिकांना घालावयाची खते, सिंचनाचे प्रकार, कृषी अवजारे, गांडूळ खत, कोंकणातील फळांच्या स्वादांचे नावीन्यपूर्ण दुग्धजन्य पदार्थ याविषयी माहिती दिली. यावेळी गावच्या सरपंच मा.सौ. रसिका केळुसकर, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, कृषी सेवक देऊळकर मॅडम, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ बाळकृष्ण गावडे सर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य. श्री योगेश पेडणेकर सर, प्राध्यापक प्रसाद ओगले सर, तसेच ग्रामपंचायत सदस्य व महिला बचत गटाच्या सदस्या आदी उपस्थित होते.या उपक्रमासाठी प्राध्यापक गोपाळ गायकी सर यांचे मार्गदर्शन मिळाले