वेंगुर्लेतील दिव्यांगांना सुवर्णसंधी


वेंगुर्ला
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग,अल्मिको व जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ADIP योजने अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील दिव्यांगाना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे -कृत्रिम हात, पाय, कॅलिपर, कुबडी, काठी, रोलेटर, व्हिलचेअर, ट्रायसायकल, इलेक्ट्रिक ट्रायसायकल, ब्रेल किट, स्मार्ट काठी, स्मार्ट फोन, एम.एस.आय.डी किट, श्रावणयंत्र यांचे मोजमाप व नाव नोंदणी शिबीर मंगळवार दि.08/10/2024 रोजी ग्रामीण रुग्णालय , वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आले आहे , तरी वेंगुर्लेतील सर्व दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा , ही विनंती ………….
सोबत आणावायाची आवश्यक कागदपत्रे-
1) दिव्यांग प्रमाणपत्र
2) आधार कार्ड
3) यूडीआयडी कार्ड
4) उत्पन्नाचे प्रमाणपत्र/ रेशन कार्ड
5) दिव्यांगत्व दिसेल असे 2 फोटो
स्थळ. ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ले
वेळ.सकाळी 10 ते संध्याकाळी 4