सोनुर्ली माऊली मंदिर ठिकाणी आयोजित केलेल्या सुप्रसिद्ध गायक अजितकुमार कडकडे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

रसिक वर्ग झाला मंत्रमुग्ध

माऊली देवस्थान कमिटी व सोनुर्ली गावच्या वतीने सुप्रसिद्ध गायक अजित कुमार कडकडे यांचा करण्यात आला सत्कार

श्री देवी माऊली देवीचा पुनप्रतिस्थापना सोहळा थाटात साजरा

सावंतवाडी

दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सोंनुर्ली गावच्या श्री देवी माऊली देवीचा पुनप्रतिस्थापना सोहळ्या निमित्त सुप्रसिद्ध गायक अजितकुमार कडकडे यांचा संगीत स्वरांची सुरेल मैफिल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिद्ध गायक अजितकुमार कडकडे यांच्या सुरेल मधुर आवाजाने व विविध प्रकारच्या गायनामुळे रसिक वर्ग मंत्रमुग्ध झाला. यावेळी प्रत्येक गायना नंतर त्यांना प्रतिसाद रसिक वर्ग देत होता. प्रथमच सावंतवाडी तालुक्यात सुप्रसिद्ध गायक अजितकुमार कडकडे यांचा गायनाचा कार्यक्रम सोनुर्ली पंचक्रोशीत पार पडला. याला रसिक वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी सुप्रसिद्ध गायक अजितकुमार कडकडे यांचा सोनुर्ली येथील श्री देवी माऊली देवस्थान कमिटी व सोनुर्ली गावाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ..यावेळी हा सत्कार देवस्थान कमिट व सोनुर्ली गावाच्या वतीने करण्यात आला.