महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उद्या २६ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजापूरच्या सभेला उपस्थिती

कणकवली

महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उद्या ता २६ ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजापूर येथे येणार आहेत. दुपारी १२ वाजता तेथील राजीव गांधी मैदानावर महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे. त्यामुळे सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर
सावंत यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.यावेळी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री दीपक
केसरकर, मंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार शेखर निकम, प्रमोद जठार, बाळ माने, यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.