

माजी आमदार राजन तेली यानी शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिदे शिवसेनेत केला प्रवेश
मुंबई
माजी आमदार राजन तेली यांनी पुन्हा एकदा आपला पक्ष बदलला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजन तेली यांनी मुंबई येथे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला.
शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून त्यांचे स्वागत करण्यात आले. श्री. तेलींनी दसरा मेळाव्याच्या दिवशी ठाकरे शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना “जय महाराष्ट्र” करून आपल्या हाती धनुष्यबाण घेतला आहे. माजी आमदार राजन तेली यांच्या शिवसेना प्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठी उलथापालथ होणारं आहे.





