त्या नराधमांना तात्काळ अटक करा.!, उबाठा सेनेचे पदाधिकारी आक्रमक


कुडाळ पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर..
कुडाळ
बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानं सद्या अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. अगदी अजाणत्या वयातच दोन चिमुकल्यांना सोसाव्या लागलेल्या या वेदनांमुळे केवळ बदलापुरातील नव्हे तर देशातील प्रत्येकजण हळहळला आणि चिमुरड्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. अनेकांनी प्रशासनाला धारेवर धरलं आणि चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या क्रूर नराधमाला फासावर लटकवा, असा एकच सूर लावून धरला. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं आश्वासन दिलं असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असंही सांगितलं आहे
📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : 8356929616