

मालवण नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून शिल्पा खोत याचा उमेदवारी अर्ज दाखल

मालवण /प्रतिनिधी
मालवण नगरपालिकेसाठी भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याचे जाहीर केले असून आज नगराध्यक्ष पदासही नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी दाखल केली . भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाले होते





