

होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक ठप्प! एस टी बस वाहतूक बंद प्रवासी वर्ग त्रस्त
होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक ठप्प
सावंतवाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्यात गुरुवारी दुपारपासून मुसळधार पाऊस पडला या सततधार पडलेल्या पाऊसामुळे सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील नदीनाले याना पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली. सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्गावरील होडावडे पुलावर पाणी आल्याने सायकाळी ६ वाजल्यापासून वाहतूक ठप्प होती वाहनचालक व प्रवाशी याचे मोठे हाल झाले .
सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्गावरील होंडावडे पुलावर पाणी आल्याने वाहतूक लगेच ठप्प होते त्यामुळे यापूलाची उंची वाढवावी अशी मागणी वाहनचालक व प्रवाशी वर्ग यांच्याकडून होत आहे . तरी पणं यांची दखल घेतली जात नाही. दरवर्षी हि समस्या निर्माण होते. मुसळधार पाऊस पडल्यामुळे वेंगुर्ले व सावंतवाडी या दोन्ही तालुक्याकडे जाणाऱ्या प्रवासी यांचे हाल झाले तसेच एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आले तसेच टू व्हीलर चार चाकी वाहने पण पलीकडे जाऊ शकत नसल्यामुळे वाहन चालक यांचे मोठे हाल झाल. कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून वेंगुर्ले पोलिसांची गस्त होणाऱ्या पुलावर पाणी आल्यावर वाढवण्यात येते. या फुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे हे फुल पुरातन असून याची उंची कमी असल्याने पाऊस जरा जरी लागला तरी या फुलावर पाणी येते त्यामुळे पंचक्रोशीतील गावाचा व दोन्ही तालुक्याचा संपर्क तुटतो.






