कोळंबी सोलणाऱ्या मच्छिमार भगिनींना दिलासा; मंत्री नितेश राणेंची विशेष भेट !-उत्तम दर्जाचे ग्लोव्हज वाटणार; मच्छी मार्केटमधील दुर्गंधीवर ठोस उपाययोजना करणार
.
नागपूर:
कोळंबी सोलणाऱ्या मच्छिमार महिलांना बोटांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तसेच मासळी बाजारातील अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानपरिषदेत महत्त्वाची घोषणा केली आहे. कोळंबी सोलणाऱ्या महिलांसाठी विशेष हातमोजे (ग्लोव्हज) उपलब्ध करून देण्याची घोषणा त्यांनी केली, तर मच्छी मार्केटमधील कचरा व दुर्गंधी दूर करण्यासाठी विभागाने उपाययोजना सुरू केल्याची माहिती दिली.
बोटांच्या संरक्षणासाठी उत्तम ‘ग्लोव्हज’
भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, कोळंबी सोलताना मच्छिमार भगिनींच्या नखांना व बोटांना मोठा त्रास होतो, कधीकधी रक्तही येते. हा त्रास कमी करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तसेच परदेशातून उत्तम दर्जाचे ग्लोव्हज मागवले आहेत. मत्स्यव्यवसाय विभागामार्फत हे ग्लोव्हज लवकरच मासळी विक्रेत्या महिलांना वाटले जातील, ज्यामुळे त्यांच्या हाताला संरक्षण मिळेल आणि काम सुलभ होईल.
मासळी बाजारातील दुर्गंधीवर उपाययोजना
विविध मच्छी मार्केटमधील कचरा आणि दुर्गंधी दूर करण्याच्या प्रश्नावर बोलताना मंत्री राणे यांनी सांगितले की, विभागामार्फत यावर उपाययोजना आधीच सुरू आहेत. या संदर्भात आमदार उमा खापरे यांच्यासोबत लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली जाईल.
क्रॉफर्ड मार्केटच्या स्थलांतरणाबाबत सकारात्मक चर्चा
यावेळी, क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी विक्रेत्यांना महात्मा जोतिबा फुले मंडईमध्ये स्थलांतरित करण्याच्या मुद्द्यावरही मंत्री राणे यांनी स्पष्टीकरण दिले. शिउबाठाचे आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांनी हा मुद्दा उपप्रश्नाद्वारे उपस्थित केला होता.
मंत्री राणे यांनी माहिती दिली की, दोन महिन्यांपूर्वी त्यांनी स्वतः मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली होती. मासळी बाजाराच्या पुनर्विकासाचा आराखडा मच्छिमारांना दाखवण्यात आला. सध्या विक्रेत्यांचे अंडरग्राउंड जागेत हलवण्यावर आक्षेप आहेत. मात्र, ही जागा केवळ तात्पुरत्या काळासाठी वापरली जाणार असून, त्यानंतर त्यांना पुन्हा वरच्या मजल्यावर उत्तम जागा उपलब्ध करून दिली जाईल, यावर सकारात्मक चर्चा पूर्णत्वास आल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.