आसोली येते जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक श्री नारायण विद्या मंदिर आसोली नं. १ या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा थाटात पडला पार

वेंगुर्ला

आसोली गावांत 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक श्री नारायण विद्या मंदिर आसोली नं. १ या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा अतिशय उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून श्रीम. संपदा साईनाथ नाईक तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री विष्णू रेडकर सर,श्री आजोबा चीपकर ( सोनसुरे ), श्री.बाळा जाधव (सरपंच आसोली ), श्री निलेश पोळजी (पो. पाटील ),,श्री संतोष तळवणकर सर ( राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य,सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ), जिल्हा सचिव रामचंद्र कुडाळकर. जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे. अशोक बोलके श्री. उदय धुरी, श्री.विजय धुरी, श्री संकेत धुरी ( उपसरपंच आसोली ) यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.


याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.. तसेच मुलांनी विविध कलाविष्कार सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.मुलांच्या कलागुणांचे तोंड भरून कौतुक केले.व शाळेचा प्रगतिशील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी शाळेच्या विकासात्मक वाटचालीबद्दल विचार मांडले.