ठळक घडामोडी

कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश!पालकमंत्री नितेश राणेंनी वेधले होते लक्ष

कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणेंनी वेधले होते लक्ष

शासन शेतकऱ्यांसोबत;मंत्री राणे

:मुंबई

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कोकणातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.मंत्री मंडळाची बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री नितेश राणे यांनी ही माहीती दिली.

अवकाळी पावसाने कोकणात अक्षरशः धुमाकुळ घातला असून नोव्हेंबर महिना आला तरी पाऊस थांबताना दिसत नाही.अवकाळी पावसामुळे कोकणासह सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.पालकमंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले होते.त्याची दखल घेतली गेली असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पालकमंत्री नितेश राणे यांनी हे सरकार संवेदनशील असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे सांगीतले.मुख्यमंत्र्यांच्या या निर्देशामुळे कोकणातील भातशेती करणारा शेतकरी असो किंवा अन्य पीक घेणारा शेतकरी या सर्वांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई शासनाकडून मिळणार आहे.