राजे प्रतिष्ठान कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग मार्फत खा. उदयनराजे भोसले महाराज यांचे निकटवर्ती, शिवप्रेमी जागिर कुरेशी यांचे करण्यात आले स्वागत

राजे प्रतिष्ठान कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग मार्फत खा. उदयनराजे भोसले महाराज यांचे निकटवर्ती, शिवप्रेमी जागिर कुरेशी यांचे करण्यात आले स्वागत

सावंतवाडी

राजे प्रतिष्ठान कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग ऑफिसला. खासदार उदयनराजे भोसले महाराज यांचे निकटवर्ती आणि विश्वासू, शिवप्रेमी जागिर कुरेशी यांनी भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आले. या वेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी शिवप्रेमी जागिर कुरेशी व संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमूख शिवा गावडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कुरेशी यांनी जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर यांचे विशेष आभार मानले .श्रीमंत साहेबांना ऑफिसमध्ये घेऊन येऊ असे म्हणाले व तुमचं सिंधुदुर्ग संघटनेचे काम खूप चांगले आहे असे म्हणाले. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सदस्य प्रा. डॉ.रमाकांत गावडे यांनी केले तर जिल्हा अध्यक्ष तळवणेकर यांनी आभार मानले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे, सिंधुदुर्ग सदस्य रमाकांत गावडे ,तालुका अध्यक्ष संचिता गावडे. खजिनदार दर्शना राणे. शहर अध्यक्ष सेजल पेडणेकर. प्रणित सावंत. संदीप सुकी, संजय लाड. शिवराज तळवणेकर. अन्य पदाधिकारी उपस्थित होते.