मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 11 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर


सिंधुदूर्ग
मालवण शहरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार दि. 11 मे रोजी दर्शन घेणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी 12:30 ते 1:30 दरम्यान पार पडणार आहे. यावेळी मंत्रिमंडळातील इतर मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी 2:00 वाजता कणकवली तालुक्यातील करंजे येथील गोवर्धन गोशाळेचे उद्घाटन देखील करणार आहेत.