राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मधुन अपक्ष फॉर्म भरणार!

सावंतवाडी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज असल्याची चर्चा सावंतवाडी विधानसभा मतदार संघात होती. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथे राष्ट्रवादीचा पदाधिकारी, कार्यकर्ते मेळावा आज आयोजित करण्यात आला असून जोरदार शक्तिप्रदर्शन त्यांनी केलं
आहे.

यावेळी अर्चना घारे-परब या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने घारे नाराज असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून मेळावा
आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना
पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरून लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सौ अर्चना घारे-परब आता कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी आमदार राजन तेलींना उमेदवारी जाहिर झाल्याने नाराज राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकमुखी निर्णय घेत अर्चना घारे परब यांना समर्थन दर्शविले. यावेळी या सभेत उपस्थितांनी हात उंचावून पाठींबा दिला आहे. यावेळी नारीशक्तीने एकच एल्गार पुकारला आता माघार घेणार असा इशारा दिला.
या मेळाव्याला राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, सामाजिक कार्यकर्ते अँड. नकुल पार्सेकर, दिपीका राणे, सेजल राणे, पुंडलिक दळवी, संजय भाईप अन्य पदाधिकारी, महिला व मोठ्या संख्येने उपस्थित होते.