ठळक घडामोडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६ मध्ये भारताचा स्वातंत्र्यदिननिमीत्त विविध राबविण्यात आले उपक्रम

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६ मध्ये भारताचा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न

सावंतवाडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६ मध्ये १५ ऑगस्ट रोजी भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण ,डंबेल्स कवायत प्रकार, भव्य तिरंगा रॅली,चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, रांगोळी प्रदर्शन,देशभक्तीपर गीत गायन अशा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
राजे प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप तर संकल्प बचत गट (भटवाडी) मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री.भालेकर सर, श्री.कल्याण कदम सर, श्री.पराडकर सर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.शुभेच्छा देताना श्री.पराडकर सरांनी यावर्षी पासून वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक इयत्तेच्या विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचे जाहीर केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती खोचरे, उपाध्यक्षा श्रीम.तुयेकर,शिक्षणतज्ज्ञ श्री.भालेकर,माजी नगरसेविका श्रीम.भालेकर,राजे प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष आणि शाळा सावंतवाडी नंबर ४ चे अध्यक्ष श्री. तळवणेकर, सचिव श्री.कदम सर, बांदा पानवळ काॅलेजचे प्रा.गावडे सर,श्रीम.संचिता गावडे, पत्रकार श्री.कुडाळकर,कोकण विभाग रिक्षा युनियन चे सचिव श्री.पराडकर सर,ॲडव्होकेट श्री.हवालदार, सावंतवाडी केंद्राच्या माजी केंद्रप्रमुख श्रीमती मुननकर, माजी केंद्रप्रमुख श्री.गवस सर,कलंबिस्त हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री पाटील सर, संकल्प बचत गट भटवाडी च्या श्रीम.साटेलकर, श्रीम.केनवडेकर आणि सहकारी, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा समितीचे श्री.तेजम सर,श्रीम.शेख मॅडम, श्रीम.केरकर ,श्रीम.जाधव,श्रीम.शर्मा,श्रीम.गौड,श्रीम.राजपुरोहित,श्री.भिसे,शाळेचे मुख्याध्यापक श्री.जाधव सर, शिक्षिका श्रीम.लांबर,श्रीम.गावडे,श्रीम.कांबळे,बालवाडी ताई श्रीम.गावडे, स्वयंपाकीण श्रीम.गावडे, विद्यार्थी वर्ग व अनेक देशप्रेमी शहरवासीय ,युवक,युवती, सहभागी झाले होते.
यावेळी ॲड.हवालदार ,श्रीम.मुननकर मॅडम,श्री.पाटील सर,बचत गट भटवाडी मान्यवर उपस्थित होते.