

स्वकर्तुत्वावर आपला ठसा महाराष्ट्र राज्यात उमटवणारा राजकीय नेता!महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर वाढदिवस विशेष

कोकण विकासाचे व्हिजन ठेवून सर्व सामान्यांसाठी झटणारे नेतृत्व!
स्वकर्तुत्वावर आपला ठसा उमटवणारा राजकीय नेता
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर
रामचंद्र कुडाळकर सिंधुदूर्ग
कोकणच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणारेमाजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक भाई केसरकर यांचा आज वाढदिवस आहे ,त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीत सिंधुदुर्ग बरोबर कोकणचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सदैव प्रयत्न केले, त्यांच्या मंत्रिमंडळाच्या कार्यकाळात त्यांनी विविध विकासात्मक निर्णय घेतले. त्याचा फायदा आता येथील सर्वसामान्य नागरिकांना होत आहे .महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री पद पण मोठया जबाबदारीने स्वीकारून ते यशस्वीरित्या पार पाडले विविध शैक्षणिक विकासात्मक निर्णय त्यांनी घेतली.पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्गचा नव्हे तर अवघ्या कोकणचा विकास झाला पाहिजे यासाठी धडपडणारे तसेच युवक, शेतकरी, मच्छीमार आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी अनेक शासकीय योजना समवेत सिंधु रत्न योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी आणून त्यांना बळकटी देणाऱ्या महाराष्ट्र राज्यांचे माजी शालेय शिक्षण मंत्री, तथा आमदार दीपकभाईंनी आपल्या मंत्रीपदाच्या काळात जिल्ह्याभर नव्हे तर अवघ्या कोकणात करोडो रुपयांचा निधी आणून विकासाची गंगा आणली.

आज मंत्रीपद नसताना आपल्या जील्याचा आपल्या मतदारसंघाचा कोकणचा विकास कसा करता येईल यासाठी सदैव प्रयत्न करत असतात.
मतदारसंघातील अनेक कामे मार्गी लागली पाहिजेत, या ठिकाणी पर्यटक आले पाहिजेत आणि पर्यटन दृष्ट्या मतदारसंघाचा आणि पर्यायाने सर्वसामान्य जनतेचा तळागाळातील लोकांचा विकास झाला पाहिजे, असे स्वप्न पाहून दिवस-रात्र झटणारे राज्याचे माजी शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री आमदार दीपक केसरकर यांचा आज वाढदिवस आहे. त्याच्या सामाजिक वाटचाल, त्यांचा विकासात्मक दृष्टिकोन याकडे टाकलेला हा महा सिंधू न्यूज चॅनल तर्फे लेख!!!!


दीपक भाई यांची राजकीय वाटचाल सावंतवाडी शहरातूनच सुरू झाली.सावंतवाडीचे नगराध्यक्ष ते राज्याचे कॅबिनेट मंत्री असा पल्ला गाठणाऱ्या माजी मंत्री तथा आमदार दीपकभाईंनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सावंतवाडी मतदारसंघ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास हे एकमेव ध्येय उराशी बाळगून अनेक उपक्रम हाताळले आहेत.
जिल्ह्यात असलेले पर्यटन साधनसामुग्री याचा फायदा होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाचा विकास व्हावा या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरु केले. या माध्यमातून केवळ घोषणा न करता कोट्यावधी रुपयांचा निधी मतदारसंघात आणून मुख्य म्हणजे मतदारसंघात गावागावात आणि पर्यटन स्थळांवर जाणारे रस्ते बळकट करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले. मतदारसंघातील महिलांचा युवकांचा आर्थिक दृष्ट्या विकास झाला पाहिजे यासाठी पर्यटन कृषी पशुसंवर्धन मत्स्य विकासाच्या अनेक योजना राबवल्या
संपूर्ण कोकणात असलेल्या युवकांना काम मिळाले पाहिजे.
विशेष म्हणजे रत्नसिंधू आणि चांदा ते बांदा या योजनेमधून घराघरात समृद्धी यावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या सावंतवाडी वेंगुर्ला आणि दोडामार्ग येथील प्रत्येक ग्रामीण कायापालट केला. अत्यंत संयमी आणि शांत नेतृत्त्व असलेले माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी कधीही कोणाला दुखवले नाही. आपला कार्यकर्ता असो वा विरोधी गटातील कार्यकर्ता सर्वांना सोबत घेऊन त्यांनी काम करण्याकडे भर दिला. त्यामुळे त्यांची ओळख अजातशत्रू म्हणून कायम राहिली आहे. ते साई भक्त आहे. त्यामुळे त्यांनी आपला स्वभाव नेहमी शांत आणि संयमी ठेवला. आपल्याकडे कोणताही गरजू व्यक्ती आला तर तो खाली हात जाणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना आणि मतदारांना ते आपल्या कुटुंबातील वाटतात.
माजी मंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर यांचा थोडक्यात परिचय
- नाव: श्री. दीपक वसंतराव केसरकर
- जन्म दिनांक: १८ जुलै १९५५, सावंतवाडी
- शिक्षण: बी. कॉम, डिप्लोमा इन एक्सपोर्ट मॅनेजमेंट
- पक्ष: शिवसेना
- व्यवसाय: बांधकाम व्यावसायिक, रिसॉर्ट, सिनेमागृह, नाट्यगृह व शेती-बागायती
- राजकीय प्रवास: काँग्रेस पक्षाचे १० वर्षे तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ९ वर्षे जिल्हा अध्यक्ष आणि ४ वर्षे प्रदेश कार्यकारिणी सदस्य. ऑगस्ट २०१४ मध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश. २००९, २०१४ व २०१९ असे चार वेळा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी आमदार.
- माजी मंत्री तथा आमदार दीपक भाई केसरकर यांनी भूषवलेली महत्त्वाची पदे-
- कॅबिनेट मंत्री, शालेय शिक्षण व भाषा, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री मुंबई शहर, कोल्हापूर
- राज्यमंत्री वित्त व नियोजन, गृह (ग्रामीण) तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग
- अध्यक्ष, सिंधुदूत समृद्ध योजना, महाराष्ट्र राज्य
- अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नगरपरिषद महासंघ
- अध्यक्ष, रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट
- संचालक, इंडियन प्लायवूड रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (भारत सरकार), बेंगलोर
- संचालक, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ
- उल्लेखनीय कार्य व पुरस्कार: केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या बांबू व लाकडावर संशोधन करणाऱ्या ‘इप्रोटो’ बेंगलोर या संस्थेवर संचालक म्हणून काम केले.
मध्यंतरीच्या काळात झालेल्या राजकीय स्थित्यंतरानंतर शिवसेनेत असलेले दीपक भाईंनी मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत जाण्याचा निर्णय घेतला आणि शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदार संघाला निधी उपलब्ध करून दिला. यावेळी त्यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्या मंत्रीपदाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दप्तराचे ओझे असो किंवा शाळेची वेळ असो याबाबतीत सकारात्मक निर्णय घेतले. विशेष म्हणजे पुस्तकातील पानांमध्ये वह्यावी असे त्यांनी उपक्रम राबवल्या त्यामुळे त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना झाला. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात जिल्ह्यात अनेक योजना राबविण्यात आल्या अनेक विकास कामे झाली राजकीय वाटचालीच्या विकास कामावर केलेले लेखन आहे.
रामचंद्र कुडाळकर सावंतवाडी







