राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे उद्या शनिवार, दिनांक १७.०५.२०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर


सिंधुदुर्गनगरी :
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे उद्या शनिवार, दिनांक १७.०५.२०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सकाळी १०.०० वा. : पुणे विमानतळावरुन विमानाने चिपी विमानतळाकडे प्रयाण.
सकाळी ११.०० वा. : चिपी विमानतळ येथे आगमन व ओरोस, जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण
सकाळी ११.३० वा. ओरोस येथे आगमन व आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थिती.
(स्थळ :- आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक पत्रकार भवन, ओरोस, सिंधुदुर्ग)
दुपारी ०२.०० वा. : ओरोस येथून चिपी विमानतळाकडे प्रयाण.
दुपारी ०३.०० वा. : चिपी विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.
दुपारी ०४.१५ वा. : मुंबई विमानतळ येथे आगमन व मोटारीने जुहू कडे प्रयाण.
दुपारी ०४.४५ वा. : अधिश निवासस्थान, जुहू येथे आगमन व राखीव.
