वडाचे झाड अंगावर पडून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू ; सावंतवाडी तालुक्यातील तळवडेतील दूर्घटना


सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री जनता विद्यालयाची १२ वीतील विद्यार्थिनी शाळेतून घरी जात असताना वडाचे झाड पडून तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तळवडे येथे घडली आहे.

सायली सतीश धुरी (१७, रा. मिरिस्तेवाडी, तळवडे) असे तिचे नाव आहे. या घटनेनंतर तिला त्वरीत सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले. या घटनेची माहिती मिळतात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.


तळवडे येतून श्री जनता विद्यालय शाळेतून सायली धूरी व तिच्या रसिका कामत व सिध्दी कोंड्ये दोन मैत्रीणी घरी परतत होत्या. तिच्या मैत्रिणी मात्र या अपघातापासून बचावल्या.
याचवेळी रस्त्यालगत असलेल्या वडाचे झाड उन्मळून तिच्या अंगावर पडले. यावेळी काही विद्युत वाहिन्याही तुटून पडल्या. वडाच झाड एवढ मोठ होत की त्यांना अचानक पळता आले नाही. रस्ता अरुंद असल्याने त्यांना पळता आले नाही.मयत सायलीच्या वडिलाचे होडावडे बाजारपेठ या ठिकाणी पानपट्टी स्टॉल आहे .अचानक अशी घटना घडल्यामुळे धुरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यावेळी घटनास्थळी तळवडे गावातील ग्रामस्थ लोकप्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.