कोकण रेल्वेच्या मार्गावर खेड आणि रत्नागिरी येथून कंटेनर वाहतूक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न :संचालक संतोष कुमार झा

रत्नागिरी

कोकण रेल्वेच्या मार्गावर खेड आणि रत्नागिरी येथून कंटेनर वाहतूक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

याचाच एक भाग म्हणून मुंबईत आज कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा आणि विविध कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठक झाली.मुंबई च्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या बैठकीला CONCOR चे अधिकारी आणि विविध कंपन्यांचे सत्तर हुन आधिक प्रतिनिधी उपस्थित होते.कोकण रेल्वेच्या मार्गावर कोकण रेल्वे कडून या उद्योजकांना काय काय सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील,व्यावसायिक फायदे कसे होतील याची माहिती व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली.यावेळी कोकण रेल्वेचे अनेक वरिष्ठ अधिकारी व विवध कंपनी यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.