ठळक घडामोडी

सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक!मतमोजणीला उत्साहात सुरुवात; भाजपसह श्रद्धा राजे भोसले आघाडीवर

मतमोजणीला उत्साहात सुरुवात; भाजपसह श्रद्धा राजे भोसले आघाडीवर

सावंतवाडी (प्रतिनिधी): संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषद निकाल आज जाहीर होत आहे. आज सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली असून, प्राथमिक कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे.
टपाली मतपत्रिकेने झाली सुरुवात नियम आणि परंपरेनुसार, मतमोजणीच्या सुरुवातीला सर्वप्रथम टपाली (पोस्टल) मतपत्रिकांची मोजणी करण्यात येत आहे. प्राथमिक टप्प्यातील या टपाली मतमोजणीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार श्रद्धा राजे भोसले यांनी आघाडी घेतल्याची माहिती समोर येत आहे. टपाली मतांच्या मोजणीनंतर प्रत्यक्ष मतदान यंत्रांमधील (EVM) मतांची मोजणी केली जाणार आहे.
सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी तहसीलदार कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी स्वतः मतमोजणी केंद्राची पाहणी केली आहे. ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • नियोजन: प्रशासनाने संपूर्ण प्रक्रियेसाठी चोख आणि काटेकोर नियोजन केले आहे.
    संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले असून, पुढील काही तासांत सावंतवाडीचा नगरद्यक्ष’ कोण, याचे चित्र स्पष्ट होईल.